अर्थशास्त्र आणि माया

मराठीत पैश्याला माया सुद्धा म्हटले जाते. एखाद्यानी जर भरपुर पैसा कमवला असेल तर 'त्याने भरपुर माया जमवली' असेही म्हटल्या जाते.आजवर मला या शब्दाची अचूकता लक्षात आली नाही पण Wall street वर चाललेल्या गोंधळामुळे माया हा शब्द किती 'अर्थ'पूर्ण आहे हे चांगलेच लक्षात आले. अर्थशास्त्राचा उगम बराच जुना आहे हे मी सांगणे न लगे. अगदी कापडाच्या बदल्यात धान्य किंवा अवजारांच्या बदल्यात गाय (याला bartering असा शब्द आहे.) ईथ पासुन तर Credit, derivatives, equities वगैरे (मला त्यातील फारस कळत अश्यातला भाग अजिबात नाही) पर्यंतचा हा प्रवास अतिशय विलक्षण आणि रसाळ (अथवा रटाळ वाचणार्यावर अवलंबुन आहे)असावा. Bartering च्या काळात धन्याच्या बदल्यात किती कापड द्यावे याचे परिमाण कुणीतरी विश्वासु आणि जाण्कार ठरवत असावे. काळानुरुपाने आता ते काम Foreign Exchange market (Forex) कडे आलेले आहे. दुसर्या महायुद्धा पासुन जगा मधे US चा पगडा वाढत गेला. झालेल्या नुकसानातुन पुन्हा उभे राहण्या करता मित्र राष्ट्रांनी US कडुन कर्ज काढले आणि पुढे जगातील उलाढालीचे Dollar हे चलन बनले. Soviet Union च्य अस्ता नंतर Capitalism चा बोलबला झाला.नवे पर्व उदयाला आले. Internet चा शोध लागल्या नंतर १९९० च्या दशकात समुद्राखालुन Optical fibers चे जाळे देशोदेशी पसरवण्यात आले. अमेरिकन economy ची भरारी internet द्वारा देशोदेशी पोहोचली. Outsourcing चे प्रमाण वाढु लागले. बेकारी कमी होउन तरुण वर्गाकडे पैसा (माया) खेळु लागला. Consumer based society (कर्ज काढुन सण करणारी व्रुत्ती) ची महती पटु लागली आणि एकंदरच कर्जाची भिती वाटेनाशी झाली. कर्ज घेणारे लोक जसजसे वाढु लागले तसतशी चांगला देणेकरी कोण हे ठरवणार्या परिमाणाची गरज वाढु लागली. त्यातुन पुढे Credit score, credit ratings चा concept निघाला. २००१ साली dot com चा bubble फुटला. पण Consumer based society ला उत्तेजन देण्यासाठी कर्जावरचा interest rate कमी करण्याचा निर्णय Federal Reserve Bank कडुन घेण्यात आला. कर्जाचे हे package इतके आकर्षक बनले की recession ला कंटाळलेली जनता कर्जावर तुटुन पडली व तो पैसा real estate मधे गुंतवु लागली. कमी का होइना पण जवळ असलेल्या पैशावर interest कमवण्याच्या कल्पनेने परदेशातील banks आणि companies सुद्धा US मधील लोकांना कर्ज पुरवु लागल्या. Companies मधे अधिकाधिक पैसा कमवण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात Credit score व credit ratings ठरवणार्या companies कश्या सुटतील. दर चार महिन्यात company चा profit वाढवताना अनेक नियम धाब्यावर बसवल्या गेले. बाजारात कर्ज देण्यास कोण लायक हे ठरवण्याची जबाबदारी मूठभर private companies होती. Moody's व Standard & Poor's ही त्यातील आघाडीची नावे). वाहत्या पाण्यात हात धुण्यासाठी दोन वेळचे कसे बसे कमावणार्या लोकांनी सुद्धा कर्जाचे अर्ज दिले. interest च्या हव्यासापायी देशी/ परदेशी investment banks, hedge funds, private companies पैसा पुरवायला आतुर होत्या. अश्यावेळी कर्जदारांना चांगले rating देउन कर्जदारांना "qualified" बनवणे व त्यावर पैसा कमवणे या हेतुने Moody's व Standard & Poor's सारख्या companies कडुन बरेच नियम डावलल्या गेले. शिवाय investment banks, hedge funds, private companies यांनी किती पैसा बजारात खेळवावा व किती शिल्लकीत ठेवावा या वरचेही निर्बंध सैल करण्यात आले. कर्जदारांनी पैसा परत केला नाही तर त्याची भरपायी करता यावी या साठी वाट्टेल तश्या गुंतवलेल्या पैश्यावर insurance काढण्यात आले. हजारो-लाखो लोकांकडुन insurance काढण्यात आल्याने insurance companies नी पैसा कमवला.हा सगळा भ्रमाचा भोपळा supply demand पेक्षा जास्ती झाल्य झाल्याच फुटला. तो फुटणे तर अटळ होतेच पण त्यात अनेक लोकांनी अनेक तर्हेनी हवा भरल्याने त्यांच्या तोंडा इतकी इजा झाली की त्यात काहींचे बळी पडले. जसा जसा supply वाढत गेला demand तशी कमी होउ लागली. पैसा कमावण्याच्या नादात लोकांनी न झेपणारे कर्ज न झेपणार्या व्याजावर घेतले. शेवटी वेळ ही आली की घराची किंमत एवढी घसरली की असणारे कर्ज त्यापेक्षा जास्ती होउन बसले. ते फेडताना लोकांच्या नाकी नऊ आले. शेवटी त्यांनी हात वर करायला सुरवात केली. याचा सुगावा लागताच गुंतवणुकदार गुंतवलेला पैसा banks ला परत मागू लागले. बाजारात banks किती पैसा खेळतो आहे याची कल्पना अनेक परदेशी गुंतवणुकींमुळे वेळेवर येउ शकली नाही. कर्ज बुडवणार्या लोकांची संख्या लक्षात घेता Moody's व Standard & Poor's सारख्या companies ने काही investment banks चे बरेच पैसे बुडण्याचे भाकित केले. ते ऐकताच एकच गदारोळ माजला आणि त्या एकाच वेळेस सगळ्या गुंतवणुकदारांनी banks कडे पैसे परत मागितले. या सगळ्याला तोंड द्यायची क्षमता नसलेल्या banks (Bear Sterns, आणि Lehman, Meryll Lynch)बुडीत खात्यात गेल्या. परिस्तिथी अधिक चिघळू नये म्हणुन बुडणार्या पहिल्या bank (Bear sterns)ला Federal Bank ने हस्तक्षेप करुन JP Morgan Bank ला घेण्यास भाग पाडले. पण बदल्यात सामन्य लोकांचा पैसा guarentee म्हणुन वेठीस लावला. सामान्य लोकांना या मुळे फसवल्यासारखे वाटले. त्यामुळे दुसरी Bank (Lehman Bros.)लयाला जाताना कुठलाही हस्तक्षेप केला नाही. Meryll Lynch ने स्वतः चा मार्ग काढला आणि तिला Bank of America नी विकत घेतले. अश्या प्रकारे Banking giants समजल्या जाणार्या या ३ महाकाय investment banks महिनाभराच्या आत लयाला गेल्या. शिवाय कर्जा बुडण्याच्या परिस्तिथीत insurance देउ करणार्या companies कडे हजारो-लाखो लोक मोबदला मागण्याची शक्यता खरी ठरली. या कारणास्तव AIG सारखी महाकाय company लयाला जायच्या मार्गाला लागली. AIG जर रस्त्यावर आली तर फक्त US मधले नव्हे तर जगभरातले लाखो लोक रस्त्यवर येतील या भितीने Federal Bank ने पुन्हा हस्तक्षेप केला आणि AIG कडुन ही सारी कर्ज विकत घेतली. या सगळ्या गोंधळामुळे US ने गुंतवणुकदारांचा विश्वास गमावला. US stock market ला उतरती कळा लागली. एकंदर परिस्तिथी इतकी चिघळली आहे की congress नी pass केलेले 700bn चे bill ही फारशी करामत करणार नाही अशी भिती सगळी कडे पसरली आहे. या पुढे काय हे कुणालाच माहिती नाही पण गंमत ही की चलनाची किंमत ठरवण्या पासुन तर कर्जदारांचे चांगले/ वाईट ranking करण्यापर्यंत तर investment banks ची दररोज बदलणारी गुंतवणुकीचे आकडे सांगण्यापर्यंत तर किती लोक कर्ज न देता हात वर करणार याचा अंदाज लावण्या पर्यंत सगळे हवेतले मनोरे. सगळेच अजब. सगळीच माया!ही माया आणि अर्थशास्त्र यात आज न कळण्या इतकाच फरक रहिला आहे. मला यातले फारसे कळते अश्यातला भाग नाही पण काही प्रश्न पडले तर घरच्या माहितगाराची मदत मात्र होते ;)