पलिकडचे जग


कुणीतरी खोलीत असावं अशी जाणीव मला सतत होत होती. अचानक डोक्यावरचा ट्युब लाईट अपशकुनी पापणी सारखा फडफडायला लागला. डॉक्टरांची विसीट आत्ताच होउन गेल्याने या अपरात्री bell वाजवुनही कुणी फिरकणार नव्हते. तरी मी हजार वेळेला सांगितले की रात्री दिवे बंदच ठेवा पण ऐकतय कोण! म्हणे hospital ची policy आहे.मरो मेली ती policy. आपल्याला तरी इथे रहायचय किती दिवस. कशाला कटकट करावी.आणि असो मेलं इथे कुणी खोलीत, माझ्याकडे कुथे आहे लुबाडायला खजिना!
पण आता मात्र या लुकलुकणार्या दिव्याचा त्रास होतो आहे. कधी मिट्ट काळोख कधी डोळे दिपवणारा उजेड. अरे का छळताय आजारयाला.बापरे! या लख्ख उजेडानी मी आंधळी झाले की काय? हे काय होतय? अरे कुणी आहे का? मी बोललेलं मलाच ऐकू येत नाहीया. हरे देवा!मी बहीरी झाले की मूकी?आत्ताच डॉक्टर सांगून गेले की आता बरीच सुधारणा आहे आणि आता हे भलतंच काय! माझ्या आयुष्याचा हा शेवट होणार? ते मघाशी जे मला खोलीत कुणीतरी असल्या सारख वाटत होतं तो माझा काळ माझं आयुष्य लुबाडायला आला आहे? आता मला हलकं हलकं वाटतय. कथा-कदंबर्यांमधे वाचलेल्या मरणार्या माणसोबत घडणार्या गोष्टी आता माझ्या सोबत घडताहेत. मी मरणार! संपलं सगळं! आता होइल पाप-पुण्याचा हिशोब त्या चित्रगुप्ता कडे. काय लिहीले आहे प्रारब्धात आता त्या सर्वशक्तिमानालाच ठाऊक.
अगदी कादंबरीत वर्णन केल्या प्रमाणे मला अनिर्बंध वाटतय.पण आजवर मेल्यानंतर पापात्मे अथवा पुण्यातमे दूरुन त्यांच्या आप्तेष्टांकडे पाहतात अश्या कथा माझ्या वाचण्यात आल्या होत्या. आंधळा, मूका आणि बहिरा अश्या दयनीय आत्म्याबद्दल वाचण्यात आले नव्हते. आत्म्यांच्या राज्यात मी नवा record बनवणार असं दिसतंय. चला जिवंतपणी नाही तर मेल्यावरच का होइना काहीतरी वेगळं केलं म्हणायचं! किंवा स्वर्ग/ नरकाकडे जाणारा गुप्त रस्ता कळु नये म्हणुन यमराजानी ही खबरदारी घेतली असावी. काय सांगता, जिथे प्रारब्ध लिहिले अहे तिथे पोहोचल्यावर सगळे इंद्रीय first class काम करायलाही लागतील. तसे झाले तर बरच होइल. Hospital मधे पलंगावर पडुन पडुन अंग दुखायला लगले होते.चला आता पाप पुण्याच्या हिशोबाला तयार होउया. आपलाही नंबर लवकरच लागेल.
अरे! माझा आकार वाढतो आहे की मी अतिसूक्षम झालेय? काळाचे, आकाराचे काही भानच उरले नाही.किती वेळ झाला मला इथे येउन? कोण घेउन आलंय मला? इथली system काय आहे तेच कळत नाही. हे असच चालू राहिलं ना तर मला काही वेळानी मी कोण हेही आठवणार नाही. कोण बरे मी? कुठुन आले? कोण आहे माझ्या मागे रडणारं? काय आहे माझ्यावाचु नडणारं? मला खरंच कही अठवत नाही.सध्या माझ्याजवळ आहे एक विशालतेचा आभास.अनंतातील शाश्वतीची सोबत. मी त्याचा एक भाग आहे. अगदी निर्गुण निराकार. कुणाचेही हाल बघायला मला डोळे नाहीत, कुणाचीही आर्त हाक माझ्या कानावर पडत नाही, कुठेही मी माझा निर्णय बोलत नाही. मला खेचुन आणणारी, मला दिशा देणारी एकच शक्ति आहे. कर्मं!कर्मातच ती ताकद आहे जी मला चांगले-वाईट दोष जोडेल. मला ब्रह्म ठरविण्याची अथवा शिव ठरविण्याची कुवत फक्त कर्मातच आहे. मुळात मी निर्गुण. मी ब्रह्मही, मीच संहारक शिवही आणि मी दोन्ही नाही. मीच रणरणतं वैराण वाळवंट आणि मीच गंगेचं पात्र, मीच एखाद्याचे नशीब आणि मीच एखाद्याचे दुर्भाग्य. अहो वळवाल तशी वळिन मी. पण वाहिन मात्र माझ्या गतीने. समय से पहिले कुछ नही मिलता. पण तुमचे नशीब तुमचे कर्म आहे.
माझ्या कर्माची फळं तर मी कधीच भोगलीत. स्वर्ग - नरक सबकुछ झुठ! तो जो तुमचा आकारा-विकारांचा देश आहे ना, अहो, तेच तर आहे स्वर्ग आणि नरक! हे इंद्रीयांचे चोचले इथे नाही. इथे आहे फक्त माझ्या वाहण्याचा आवाज.माझं वाहणं हेच तेवढं शाश्वत.
काय म्हणता, पुनर्जन्म आहे का? या आंधळेपणाला, मूकपणाला आणि शांततेला घाबरला नाहीत, या सततच्या वाहण्याला कंटाळला नाहीत तर पुनर्जन्म नाही. अन्यथा हे बळ येईतो आहेच पुन्हा तो जन्म.
मी मात्र रमलेय ईथेच. ईथे माझ्याशिवाय कुणीही नाही!