माझे 'गेलेले' दिवस

Break च नाव घेतला आणि जोराताच ब्रेक लागला. परवा एकदम blog बद्दल अठावल. गोखले बाई चा कुठल्यातरी टेस्ट साठी फ़ोन आला होता. मी साफ़ 'येत नाही' म्हणून सांगितले.
माझ्या 2nd Trimester च्या सुरवातीला आम्ही Miami ला गेलो. खुप मजा आली. माझ्या नवार्यानीही खुप enjoy केला. शिवाय त्या वेळाचा हिवाला इतका बेकार होता की तो change आम्हा दोघांनाही आवडला. ते दोन महीने खुप छान गेले. पण त्याची भरपाई नंतर च्या महिन्यात करावी लागली. दर गुरुवारी बाई  आमची वरात hospital ला घेउन जायच्या. पहिल्या वेळेस नुसतच रात्रभर राहून आलो. दुसर्या वेळेस दोन तासातच सोडले. मात्र तिसरी चांगलीच लक्षात राहील. दोन painful tests, एक ultra sound, अणि एक dozen injections नी ती रात्र गाजवली. एक कुठला तरी औषध IV तुन दर दोन तासाला द्यायचे. त्या औषाधानी palpitation वाढायाचा, एकदम थंडी वाजायची आणि हृदय घशात आल्यासारख वाटायचा. रात्रभर त्या डोस चा भिडीमार झाला. सकाळी उठून पुन्हा आदल्यादिवाशी सारखेच मांडीत injection खुपसले. ते injection तसेच द्यायचे असते म्हणे. ही सगली तयारी बाल लवकर झाल तर lungs नीट develop झालेले असावे म्हणून होती.
माझ्या या 'गुरुवार' प्रकारनी माझ्या कमावाराच्या लोकांना tension आले. अर्थात माझे नाही तर काम कसे होईल याचे ! त्याच  दरम्यान माझी एका परिक्षेची तयारी चाललेली होती. classes साठी एका ठिकाणी ५ तास बसायला लागायचे. या hospitalization मूले अभ्यासही होत नव्हता. कामात मागे पडू नये म्हणून कामही जोरात चालले होते. शेवटी कामावाराच्या लोकांनी मला जून पासून घरी बसवायचे ठरवले. मला थोड़े वाईट वाटले. पण मी जुलाई पासून सुट्टी काढानाराच होते. एक महिना आधीच घरी बसावे लागले. पहिला आठवडा परिक्षेची तयारी आणि परिक्षेतच गेला. अभ्यासाला एक आठवडा मिलाल्याने मलाही बरे वाटले. नंतरचे ३ आठवडे internet वरून बालासाठी लागणार्या वस्तुंची यादी बनवून खरेदी करण्यात गेला. मी हे सगळ जुलाई मधे आई-बाबा आल्यावर करणार होते. जुलाई चा पहिला आठवडा आई-बाबांसाठी घर नीटनेटक करण्यात गेला. ७ जुलाई ला आई-बाबा आले. सकाली त्यांना घ्यायला गेलो. त्यांना jet lag येऊ नये म्हणून गोखले बाईनचया सांगण्याप्रमाणे ultra sound ला गेलो. तिथून सरळ बाईंच्या clinic मधे  नस्त करायला गेलो. दोन तास झाले तरी बाई सोडेना म्हणून बाबा आणि नवरा घरी निघून गेले. मग बाई म्हणाल्या की काहीही ना खाता hospital ला जा. पण आमचा hospital शी बराच सम्बन्ध आल्याने मी जेवून जायचे ठरवले. जेवून मी लगेच hospital ला गेले. आम्हाला खात्री होती की लगेच discharge मिळेल. पण बाई बराच वेळ hospital ला आल्याच नाहीत. रात्री १२ च्या सुमारास आल्या नंतर sakaalee ५ वाजता त्या म्हणाल्या की आता तुला admit करून labor रूम मधे shift करू. तिकडे आई-बाबा नुकतेच आलेले. त्यांना घरातल काहीच माहिती नाही. hospital मधे काय चालला आहे हेही माहिती नाही. हे सगळ माहिती असल्याने माझा नवरा शाक्य तितक्या घर- hospital चकरा मारत होता.
बाइन्ना १२ तासात ५ वेळा contraction होत असताना heart beat खाली गेलेलेल्या दिसल्या. Nurse चे म्हानाने होते की त्यात   अब्नोर्मल काहीही नाही. पण बाई ऐकायला टायर नाही. त्यांना इतकी घाई झाली की room available असती तर त्यांनी लगेच   ऑपरेशन केले असते. माझ्या सुदैवाने ७ ला गुरु पौर्णिमा असल्याने टेकलेल्या सगळ्या बायका त्याच दिवशी hospital ला आल्या आणि सगळ्या रूम्स आणि staff busy होता. आम्ही risk घेउन घरी जायची तयारी दाखवली तर त्यावर त्या म्हणाल्या की माझी मुलगी असती तरी मी हेच decision घेतले असते. तुम्ही घरी जाल आणि heart beat नाही म्हणून परत याल तर वेळ निघून गेलेली असेल. पण असेच काही होइल याचीही त्या guarantee देत नव्हत्या. कधी कधी बाळ नालेशी खेलत म्हानुनाही असा होऊ शकता असा त्या म्हणाल्या. आम्ही त्यांना Ultra sound करा असा म्हटल्या वरही एरवी काहीही नसताना १० वेळा Ultra sound ला पठावनार्या बाई नी Ultra sound केले नाही. असे असल्यावर आमच्या पुढे कसलाही उपाय नव्हता. आम्ही 'हो' म्हणताच बाइन्नी तयारीला सुरुवात केली. पण स्टाफ इतका busy  होता की त्यांना सगळ्याननी थाम्बायाला सांगितले. मी त्यांना ठणकावून सांगितले की मला monitor ला कितीही वेळ बांधून ठेवा पण सगळ normal असताना  operation करू नका.
तिकडे आई-बाबानवर काय बितली असेल त्यांनाच माहिती.

क्रमश: