पावसाळ्यातली शाळा

परवा लायब्ररी मधे जाताना आभाळ भरून आल होत। वाटेत JPStevens highschool लागली। रोज पेक्षा शाळेत कमी गाड्या उभ्या होत्या मला अचानक माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण आली अश्या वातावरणात आई किती प्रकारे नको जाऊ हे सांगुन पहायची 'आज शाळेत कुणीही येणार नाही तुमची teacher सुद्धा येणार नाही कशाला जाते शाळेत ?' असे प्रश्न विचारले जायचे पण आईलाही माहिती होते की निव्वळ त्याच कारणासाठी मला शाळेत जायचे असायचे Raincoat घालून आणि दप्तारावर plastic टाकुन मी घरून निघायचे आणि अगदी वेळेवर पोहोचायचे अपेक्षे प्रमाणे शाळेत मी आणि माझ्यासारखे टारगट एक दोघे वर्गात असायचे आम्हाला पाहून 'मेल्यान्नो, कशाला आले तड्फ़डत?' असे वाचण्याजोगे भाव शिक्षकांच्या चेहर्यावर असायचे मग कधी नुसत्याच गप्पा व्हायच्या तर कधी period off मिळायचे। मग नुसतीच मस्ती अश्याच एका दिवशी off period मधे मी desk वर तबला बडवायला सुरुवात केली माझ्या desk वरुन दारातून येणारा-जाणारा दिसायचा दुरूनच K.B जोशी नावाचे खडूस मास्तर रागारागात येताना दिसताच मी desk बडवणे थम्बवले मी थांबत नाही तोच दुसर्या एका मुलाने desk बडवणे सुरु केले। त्याच वेळेस वर्गात सरांची entry झाली मघासपासून तबला बडवुन डोक उठावल म्हणुन सरांनी त्याला बडवल। माझ्या  नशीबानी माझ्या बाजूला बसलेल्या मुलीनी तोंड उघडले नाही नाहीतर desk बडवणे जन्मभरसाठीच cancel करावे लागले असते
शाळेतुन घरी येतानासुद्धा मजा यायची cycle मुद्दाम साचलेल्या पाण्यातून घेउन जायचे पाय भिजू ये म्हणुन ते पायडालवर घ्यायचे. घरी आल्यावर आईने विचारायचे 'किती मूल आली होती? आमकी अली होती का, तमकी आली होती का?' तिला हसत 'नाही' हे उत्तर देणे ठरलेले असायचे. कितीही waterproof दप्तर घेतल आणि कितीही plastic coated covers लावले तरीही भिजलेली पुस्तक fan खाली ठेवण्याचा एक उद्योग व्हायचा. आईनी हातात दिलेल्या towel नी खसखसुन डोके पुसले जायचे. आणि गरम गरम दूध आनंदानी मिटकवले जायचे.
दुसर्या दिवशी शाळेत पावसामुळे न आलेल्या मैत्रिणिन्ना आदल्या दिवशी झालेल्या गोष्टी तिखट मीठ लावून सान्गण्यातली मजाच काही और होती. आम्ही काही तरी dashing केले असा तोरा त्यात असायचा.
या आठवणिन्नी पावसात लायब्ररी मधे जाणे सार्थकी लागले म्हणायचे !

माझे 'गेलेले' दिवस

गोखले बाईंच्या नादात मी एक लाख्शात घेतले पाहिजे की माझे सगलेच दिवस वाईट नव्हते। बाईनी जरी मला६ व्या आठवड्यात घाबरवले तरी माझ्या बाळाला पहिल्यांदा पहाण्याचे सुख अवर्णनीय होते। फारसे काही कळले नाही पण त्याच्या heart beats ऐकून मी खूपच excite झाले होते। शिवाय मला जो काहीएक महिना उलट्यांचा त्रास झाल त्यात माझ्या नवार्यानी केलेली मदत ही आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी आहे। त्या काळात मला उलट्यान्मुले सारखेच बरे नाही असे वाटायचे। एक दिवस सगाल्याचा वीट येउन सकाळपसुनच मी रडायला सुरवात केली। तेव्हा त्यानी मला जे सांगितले त्या नंतर मी कधीही बरे वाटत नाही म्हणुन रडत बसले नाही। तो मला म्हणाला 'अग तू अशी रडलीस तर रडक्या जीवाला आकर्षीत करशील आणि दुखी जीव जन्माला येइल। हे दिवस थोडेच दिवस राहतील तेव्हा धीर धर।' आणि झालही तसाच। १५ दिवसांनी उलट्या थाम्ब्ल्या सुद्धा!
मधल्या काळात गोखले बाईंनी सुखानी बासु दिले अश्यातला भाग मुळीच नाही। मधेच त्यांना काय शंका आली तर त्यांनी मला oncologist कडे पाठवले! मीही जास्ती tension न घेण्याचे ठरवले। Tension घेउनही उपयोग काय होणार होता :)
January नंतर माझी तब्बेत एकदम झकासच झाली होती। माझ्या नवर्याचे भरपूर काम चालले होते आणि मीही झाल्या प्रकाराने दामले होते। तेव्हा आम्ही मस्त break घ्यायचे ठरवले।

क्रमश:

माझे 'गेलेले' दिवस

आमच्या कंप्यूटरनी मान टाकल्याने आजकाल माझे वेब वर येणे orkut, gmail, yahoo पुरातेच सीमित असते। त्यामुळे 'गोखले बाईंच्या सुरस कथा' राहुनच गेल्या :D ६व्या आठवड्यातच गोखले बाईंनी आमच्या हृदयाचा ठोका चुकवला। पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येक छोट्या गोष्टी आम्ही डॉक्टर ला सांगायच्या ठरवल्या। माझा blood group -ve असल्याने त्यांनी आम्हाला काळजी घ्यायला सांगितली। ६व्या आठवड्यात आम्हाला काळजी वाटताच आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सगळ्या आशा मावळल्या असण्याची शक्यता सांगितली। खर तर तशी शक्यता १०% आणि तसे नसण्याची शक्यता ९०% होती! हां आम्हाला बसलेला पहिला झटका! Ultrasound मधे सगळे ठीक असल्याचे कळले। त्या नंतरच्या tests मधे मला iron defeciency आहे हे लक्षात आले तर तिनी मला Alpha thalassemia असण्याची शक्यता सांगितली। त्यानंतर आम्हाला घबरावण्याचा तिनी चंगच बांधला। माझ्या नवर्याला जर Alpha थालास्सेमिया असेल तर पुढच्या आमच्या सगळ्या आकांक्षा धुळीस मिळतील असेही बी बोलल्या। Fortunately माझ्याकडे आधीच्या test चे result असल्याने टी शक्यता मीच खोडून लावली। पण मला iron च्या गोळ्या सुरु झाल्या आणि माझा सुखाचा जीव दुःखात पडला। गोळ्या suit न झाल्याने मला नसलेला उलट्यांचा त्रास सुरु झाला! ऑफिस मधे डोंगरा एवढे काम आणि अतिशय hostile टीम यामुळे माझा धीर सुटला। या परिस्थित माझा नवर्याचा मला खुप आधार मिळाला!

-क्रमश:

माझे गेलेले 'दिवस'

नव्हेम्बर महिन्यात आमच्या घरी गोड बातमी आली आणि माला दिवस गेल्याचे कळले। तेव्हा पसुनाचा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणिय होता। खरतर तो प्रत्येकच स्त्रीसाठी अविस्मरणिय असतो। पण माझा प्रवास अजुन एक कारणा साठी अविस्मरणिय होता। ते कारण म्हणजे माझी डॉक्टर ! Preliminary test मधे 'Good news' कळल्यनन्तर कुठलाही विचार न करता आम्ही या डॉक्टरकड़े गेलो। त्यांचा नाव आपण या गोश्टीपुरत 'गोखले' ठेऊ। तर मराठी डॉक्टर आणि ३० वर्षांची practice असल्याने आणि काय विचार करायचा होता। तसे त्यांच्या तर्हेवाइकपणाचे किस्से माहिती असुनही आम्ही त्यांना निवडले। Preliminary टेस्ट चे reports घेउन गेल्यावर पहिल वाक्य बाईंच्या तोंडून निघाल ते अस 'रिपोर्ट्स वरुन तुम्हाला कळलच आहे की ही pregnant आहे, तेव्हा मी congratulations वगैरे काही म्हणणार नाही।' त्यांच्या या बोलण्यानी आम्ही चाटच पडलो। खरतर तेव्हाच आम्ही तिथून उठून जायला हवे होते पण दुर्दैवाने आम्ही तसे केले नाही।
क्रमशः

चीमा काय कामाची?

लहानपणी या वाक्याची आम्हाला फारच गंमत वाटायची. या वाक्याला उलटे वाचले तरी तेच वाक्य बनते. शिवाय कॉलनी मधे चीमा बोरगावकरला चिडवायलाही हे वाक्य वापरले जायचे. चीमाचे खरे नाव मला आजही माहिती नाही.बिचारी चीमा!पण हल्ली मला चीमा असल्या सारखे वाटायला लागले आहे।
मागच्या वर्षी मी जेव्हा भारतात गेले तेव्हा मला अमुलाग्र बदल दिसला. माझे जे तिथले अनुभव आहेत ते इथल्या ओळखीतल्या जवळ-जवळ सगळ्यांनीच अनुभवले. पण बर्याच जणांना या बदलाची जी खंत वाटली ती मला वाटली नाही. बदल हे प्रगती चे लक्शण आहे आणि तुम्हला आम्हाला गोष्टी कितीही बदलू नये वाटलं तरी त्या बदलतीलच. मला आनंद आहे की हा बदल आपल्या देशाच्या बाब्तीत चांगल्या दिशेनी घडतो आहे. शिवाय जोवर आपलं घरटं जस उबदार होतं तसंच ते परतल्यावरही असलं तर जग बदलले तरी काय फरक पडतो !या झपाट्यानी बदलणार्या परिस्तिथीच आपण भाग नाही ही खंत कधी उरतच नाही. जर कधीही या घरट्याची आठवण येउन मन उदास होते तेव्हा विचार येतो की आपण आणि मुंबई/पुणे, बंगलोर, दिल्ली या सारख्या ठिकाणी काम करणार्या लोकांची परिस्थिती आपल्यापेक्शा काय वेगळी! ते तरी कुठे उठसुठ आपल्या गावी जाऊ शकतात? आणि माझ्या काही मैत्रिणी खरच वर्षा दीड वर्षांनी माहेरी जातात. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक? पण फरक आहे!वेळ प्रसंगी त्या मदतीला जाऊ शकतात. दोन दिवस/ पंधरा दिवस राहू शकतात. मी नाही जाऊ शकत. मागच्या वर्षी चे उदाहरण मला चांगलेच आठवते. माझ्या नवर्याला त्याच्या मावशीची तब्बेत वाईट असल्या बद्दल कळले. त्यानी लगेच जायचा विचार केला. पण त्याला विसा renew केल्या शिवाय देश सोडता आला नाही. सुदैवानी मावशींची अजुनही भेट होते. पण अश्या वेळेस इथे असण्यातला आणि तिथे असण्यातला फरक कळतो आणि विचार येतो आपण काय कामाचे!घरच्यांना ही परिस्थिती आधीच माहिती असते. घरच्या चिंतापासुन ते आपल्याल दुर ठेवु लागतात. चिंता सांगुन उपयोग तरी काय? एवढ्या दुरुन करु तरी काय शकणार?लहानपणी घरी बरेच कठीण प्रसंग आले. कधी चिमुकल्या मनाला प्रसंगाचे गांभीर्य कळले कधी सगळ्यांचे चेहरे पाहुन वेडेवाकडे वागू नये एवढेच लक्शात आले. मोठे झाल्यावर कधी मदत करता आली तर कधी कधी घरच्यांची तकतक नुसतीच दुरुन पाहिली. जाणते अजाणतेपणे या प्रसंगांनी बरेच काही शिकवले. त्या क्शणांचा मी भाग होते हा विचार निराळे समाधान देऊन जातो. पण आज या हजारो मैलांच्या अंतरानी ते क्शण माझ्यापसुन साता समुद्रा पलिकडे नेले. मला कळेपर्यंत घरातील वादळ शमलेले असते. पण त्या वादळातुन माझे लोक कसे गेले असतील, त्यांना कोणी मदत केली असेल, त्यांच्यावर कसे प्रसंग आले असतील हे विचार आल्या शिवाय रहात नाही. आणि शेवटी विचार येतो घरची चीमा घरटे सोडुन दुर निघुन गेली.आता चीमा काय कामाची?