सिनेमा आणि माझे (गैर) समज
माझे सिनेमा संस्कार माझ्या ताईने माझ्यावर घडवले. तीला सिनेमाचे भलतेच वेड. तीचा अभ्यास रेडीयोच्या संगतीत चाले.आमच्या घरातील रेडीयोवर जाळी न चढु देण्याची जबाबदारीच जणु तीच्यावर होती. तसे माझे आई-वडीलही सिनेमा संगीत प्रेमी.रेडियोचा वापर ते फक्त कोणतं गाणं गावं हा clue घेण्यापुरता करत. अर्थात हे फक्त जुन्या गाण्या पर्यंतच मर्यादीत असे. पण त्यामुळे झाले काय की आमच्या ताईला जुने काय आणि नवे काय सगळे सिनीमे आणि सगळी गाणी पाठ. कुठले गाणे कुठल्या सिनेमातले किंवा कुठला नट-नटी कुठल्या सिनेमात अशी दोन गटांमधे पैज लागली की ताईचा गट हमखास जिंकत. त्यावेळेस google/internet available नसल्याने आमची ताई हिंदी सिनेमाच्या encyclopedia चे काम करी.तर ताई करते म्हणुन मी करणार असे माझे दिवस येताच माझी सिनेमा ओळख सुरु झाली. पण आजही मी ताई किंवा आई-बाबांच्या नखाचीही बरोबरी करु शकले नाही.पण या सगळया भानगडीत सिनेमामुळे माझे जे समज-गैरसमज निर्माण झाले ते आजही फारसे बदलले नहित.उदहरणार्थ, बरेली या गावाचा मुख्य धंदा चोरी असावा आणि संध्याकाळी थकुन-भागुन आलेले चोर बरेलीच्या बाजारात मन रमवत असावे असे माझे ठाम मत झाले.कोल्हापुरच्या मुली भलत्याच street smart असतात आणि भल्याभल्यांना पाणी पाजतात अशी एक image तयार झाली आहे.सातारा हे गाव मुली-बाळींसाठी अतिशय वाईट असल्याने एकट्य मुलीने (अपवाद कोल्हापुरच्या मुली)चुकुनही तिकडची वाट धरु नये असही बर्याच समजांपैकी एक समज.कही नावांभोवतीही चित्रपट स्रुष्टीने एक वलय निर्माण केले आहे. विजय हे नाव एक्दम दमदार वाटतं. लाईफबॉयची जहीरात करणारा किंवा वज्रदंती वापरुन अक्रोड फोडणार्याचे नाव विजय असावे. तर प्रेम किंव्वा राज हे नाव उच्चारताच एखादा पुचाट देवानंदच्या अंगयष्टीचा माणुस डोळ्यापुढे येतो.रामुकाका किंवा दिनुचाचा म्हणजे खांद्यावर पंचा घेतलेला A.K. हंगल सारखा माणुस डोळ्यापुढे येतो.रामुकाका किंवा दिनुचाचा हे पात्र प्रेम नावाच्या पात्रा भोवती किंव्वा एखाद्या भूत बंगल्यात कंदील घेवुन करकरता दरवाजा उघडतानाच शोभुन दिसत. अश्या प्रसंगी त्यन्चे कौतुकाचे भाव किंवा डोळ्यातील भकास भाव scene मधे भलतीच जान आणतात.Jimmy, Rocky, Anthony, सुर्या, देवा अशी पात्र पैदाईशी अनाथ आणि ज़ुल्मों के शिकार असतात.शिवाय गोगा, पाशा, ठकराल, शाकाल या नावांशिवाय तर सिनेमाच अधुरा.काही नावं अशी असतात की अशी नाव असलेल्या लोकांना काही अस्तिवच नसतं पण त्यांच्या मुली सिनेमाच्या heroin असल्याने त्याना सिनेस्रुष्टीत उदंड आयष्य आहे. जस की मुनिमजी, मुंशीजी, दिवाणजी, Mr.रस्तोगी,Mr.सक्सेना,Mr.देसाई इत्यादी.आता english किंवा hinglish सिनेमात थोड्याफार फरकानी ही नावं बदलतील पण categories मात्र अश्याच असतील.माझे हे समज ताईच्या समजांशी मिळते जुळते न्सतील पण एक मात्र नक्की की या सिनेमामुळे आम्ही दोघींनी गमती मात्र फार केल्या. ताईचे वाढते वेड पहुन आणि माझाही त्यातला सहभाग पाहुन बाबांनी आमच्यासाठी Philips चा double door stero आणला. झालं....आमच्या गाणी tape करण्याच्या सत्रांना सुमारच राहिला नाही.आमच्या कचाट्यातुन 'पु.ल पेटी' सुद्धा सुटली नाही. हळहळण्या व्यतिरीक्त बाबांपुढे कुठला ही उपाय रहिला नाही.त्यात भर म्हणुन माझी आत्ते बहीण अम्हाला सामिल झाली. आत्या कडच्या 'मुंगी उडाली आकाशी' वर आता धडकन ची गाणी वाजायला लागली.दोन्ही घरे बेजार झाली. ताईचे लग्न झाल्यावर सत्र थंडावले आणि लोकांच्या जीवात थोडा जीव आला!अजुनही CD वर गाणी burn करताना 'पु.ल पेटी'आणि 'मुंगी उडाली आकाशी'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही आणि माझी हसुन पुरेवाट होते. आमच्या stero मुळे खुपच धमाल उडाली होती!
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
khuch chan lihila aahes tu.....mala athavta tu ani tai kaye dhamal karaycha teye :)
oh.......ata mala samajla sleeping beauty college madhe zopaychi ka teye.......tumchya ghara javal rahaychi na teye.......
khup chan lihil aahes
aavadal
Post a Comment