आवडत्या कवितांचा संग्रह

आश्चर्यठाऊक असणं आणि ठाऊक नसणं यांच्याखेरीज आणखी एक असतं ठाऊक असूनही ठाऊक नसणं
फांदीवर कुठे आहे लपलेला गाणं गाणारा पक्षी, वाट पाहणा-या डोळ्यांसारखं वेलीवरचं फूल नेमकं जरी तुम्हाला ठाऊक असलं तरीही ते ठाऊक नाही मुळीच असं समजून शोधायचं असतं : फूलाला आणि पक्ष्याला हवा असतो तुम्ही शोध घेतलेला !
आणि जेव्हा शोध लागल्याचं आश्चर्य व्यक्त करता तुम्ही अचानक कवितेची नवी ओळ सुचल्यागत तेव्हा हे प्रथमच नव्याने अनुभवल्याचा साक्षात्कार तुम्हाला कसा होतो हे मात्र तुम्हाला कळूनही कळत नाही...
मंगेश पाडगावकर


सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी तितकी मते;
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल;
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ;
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के;
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा;
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग;
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय.
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी;
जिकदे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्यची सत्ता;
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार;
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा;
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के.
सब घोडे बारा टक्के!

-विं.दा

तहानलेल्या क्षितिजानं ओंजळभर
पाणी मागितले तेव्हा
समुद्र ओशाळला
आजवर त्याला फक्त
समर्पण स्वीकारण्याचीच
सवय होती

- संजीवनी बोकिल

सगळंच काही लिहिता येत नही कगदावर;
पण न लिहिलेलंही वाचता येतं तुलाच!
सगळंच काही बोलता येत नाही शब्दांत;
पण अशब्दातलं सगळं समजतं तुलाच!
सगळेच अश्रु काही डोळ्यातुन ओघळत नाही;
पण न ओघळणारे दिसतात तुलाच!
असाच विश्वास ठेवते, वेळी अवेळी हाक मारते,
तुझ्या कानी ती जाणार नाही ही काळजी घेते,
अन ओ दिली नाहीस म्हणुन दोषी ठरवते
तेही तुलाच!

-पद्मा गोळे

माझ्या बेसावध खिडकीतून
येते उतरून
हळुच उन्हाचे भित्रे मांजर....


काचेच्या गालांना करुनी
शेपटीच्या मिस्किल टोकाने
हळुच गुदगुल्या....
गुबगुबीत पंजात आपुल्या
नखे लपवूनी
पडून राहते
सुस्तपणाने मिटून डोळे....

.... अन दाराच्या
झुलणार्‍या पडद्याची छाया
विणू लागते त्याच्यावरती
झिरझिरीत जाळीचे चेटूक....

-मंगेश पाडगांवकर



मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिलेघट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले
मनात मने गुंफताना भरून आला जीववाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव
प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचयपुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय
गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोलक्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल
स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीतसूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत
रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रणनिकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन
-Shanta शेलके

खुणा
किती अलगद पाऊल टाकत आलेतरीही उठल्या खुणापाहिन पुसाया, होतील ठळकचआणि बोलक्या पुन्हा!

-पद्मा गोळे


मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा

स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा

मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले

मन रानभूल मन चकवा मन काळोखाची गुंफ़ा

मन तेजाचे राऊळ मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल

दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही

या अनोळ्खी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा

सुधीर मोघे



No comments: