पावसाळ्यातली शाळा

परवा लायब्ररी मधे जाताना आभाळ भरून आल होत। वाटेत JPStevens highschool लागली। रोज पेक्षा शाळेत कमी गाड्या उभ्या होत्या मला अचानक माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण आली अश्या वातावरणात आई किती प्रकारे नको जाऊ हे सांगुन पहायची 'आज शाळेत कुणीही येणार नाही तुमची teacher सुद्धा येणार नाही कशाला जाते शाळेत ?' असे प्रश्न विचारले जायचे पण आईलाही माहिती होते की निव्वळ त्याच कारणासाठी मला शाळेत जायचे असायचे Raincoat घालून आणि दप्तारावर plastic टाकुन मी घरून निघायचे आणि अगदी वेळेवर पोहोचायचे अपेक्षे प्रमाणे शाळेत मी आणि माझ्यासारखे टारगट एक दोघे वर्गात असायचे आम्हाला पाहून 'मेल्यान्नो, कशाला आले तड्फ़डत?' असे वाचण्याजोगे भाव शिक्षकांच्या चेहर्यावर असायचे मग कधी नुसत्याच गप्पा व्हायच्या तर कधी period off मिळायचे। मग नुसतीच मस्ती अश्याच एका दिवशी off period मधे मी desk वर तबला बडवायला सुरुवात केली माझ्या desk वरुन दारातून येणारा-जाणारा दिसायचा दुरूनच K.B जोशी नावाचे खडूस मास्तर रागारागात येताना दिसताच मी desk बडवणे थम्बवले मी थांबत नाही तोच दुसर्या एका मुलाने desk बडवणे सुरु केले। त्याच वेळेस वर्गात सरांची entry झाली मघासपासून तबला बडवुन डोक उठावल म्हणुन सरांनी त्याला बडवल। माझ्या  नशीबानी माझ्या बाजूला बसलेल्या मुलीनी तोंड उघडले नाही नाहीतर desk बडवणे जन्मभरसाठीच cancel करावे लागले असते
शाळेतुन घरी येतानासुद्धा मजा यायची cycle मुद्दाम साचलेल्या पाण्यातून घेउन जायचे पाय भिजू ये म्हणुन ते पायडालवर घ्यायचे. घरी आल्यावर आईने विचारायचे 'किती मूल आली होती? आमकी अली होती का, तमकी आली होती का?' तिला हसत 'नाही' हे उत्तर देणे ठरलेले असायचे. कितीही waterproof दप्तर घेतल आणि कितीही plastic coated covers लावले तरीही भिजलेली पुस्तक fan खाली ठेवण्याचा एक उद्योग व्हायचा. आईनी हातात दिलेल्या towel नी खसखसुन डोके पुसले जायचे. आणि गरम गरम दूध आनंदानी मिटकवले जायचे.
दुसर्या दिवशी शाळेत पावसामुळे न आलेल्या मैत्रिणिन्ना आदल्या दिवशी झालेल्या गोष्टी तिखट मीठ लावून सान्गण्यातली मजाच काही और होती. आम्ही काही तरी dashing केले असा तोरा त्यात असायचा.
या आठवणिन्नी पावसात लायब्ररी मधे जाणे सार्थकी लागले म्हणायचे !

1 comment:

Urmil Amol said...

nice post...made me nostalgic as well :) especially mention of KB JOshi sir...baapre....Chemistry cha perios nakisa karun takla hota tyani....