East-West Germany आणि भारत - पाकिस्तान


बरेच दिवस मला वाटायच की East आणि West Germany च्या सारखेच भारत आणि पाकिस्तान चे एकत्रीकरण शक्य आहे. जास्ती खोलात गेल्यावर मात्र दोघांच्या विभाजनातले फरक लक्षात आले आणि माझी कल्पना मोडित निघाली.
दुसर्‍या महायुद्धानंतर मित्रपक्षांनी सम्पूर्ण Germany ला चार भागात विभागले. एक भाग अमेरिकीच्या खाली, दुसरा फ्रान्स च्याखाली, तिसरा ब्रिटन कडे तर चौथा रशिया कडे गेला. या विभाजनाच्या मागे नाझीवाद संपवणे, Germany मधील लष्कर हटवणे व तेथे लोकशाही आणणे असे हेतू होते. हे साध्य झाल्यावर विभाजीत भागांचे एकत्रीकरण करून नवीन राष्ट्र उभारण्याचा मित्रपक्षांचा उद्देश होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात कुठेही German  नागरिकांनी एकमेकांपासून वेगळ व्हायची इच्छा दर्शवली नव्हती. हे विभाजन त्यांच्यावर थोपवले गेले होते व विभाजनाचा अन्तिम उद्धेश एकत्रीकरण हा होता.
बर्लीन ही नझींची राजधानी असल्याने, हे शहर रशियाच्या विभागात असूनही चारही राष्ट्रांनी याचे विभाजन करून आपापले प्रशासन तेथे आणले.
१९४७ ते १९४९ च्या काळात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स प्रशासित भागांचे ठरल्याप्रमाणे एकत्रीकरण झाले व Federal Republic of Germany किंवा West Germany निर्माण झाले. परंतु Germany पूर्व भागावरचा ताबा सोडण्यास रशियाने नकार दिला व तेथे  German Democratic Republic (GDR) किंवा East Germany निर्मिती झाली. तसेच बर्लीनच्या तीन भागांचे एकत्रीकरण होऊन West Berlin व East Berlin निर्माण झाले. East Germany मधील communist  सरकार खालील लोकांना बाहेरच्या व खास करून West Germany च्या समृद्धीची कल्पना येऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रवासाची बंधने आणली व पाश्चिमात्य जगातील समृद्धीचे दर्शन घडवणारे TV shows निषिद्ध केले. पाश्चिमात्य जगातील Capitalistic society मधल्या भ्रष्टाचाराचे दर्शन घडावे म्हणून एक TV show तेवढा चालू ठेवला. तेवढ्या एका TV show  मधूनच East Germany लोकांना बाहेरच्या जगातील ऐशवर्याची कल्पना झाली.
पुढे मिखाईल गोर्बाचेव यांची रशिया मधे निवड झाली असता East Germany  मधील नागरिकांवर लादलेली अनेक बंधन शिथिल करण्यात आली. यातच प्रवासावर टाकलेली बंधने पण उठवल्या गेली. त्याच वेळी १९८९ साली East Germany  मधे नवीन सरकार सत्तेवर आले. East Germany च्या सीमेवरच्या रक्षकांना सीमा पार करणार्‍या नागरिकांना रोखण्याचे कुठलेही निर्देश ना दिल्याने त्यांनी सगळ्यान्ना West Germany मधे न रोकता जाऊ दिले. नवीन सरकार सत्तेवर आल्याच्या दुसर्‍याच आठवड्यात सुमारे ५० लाख East German West Germany त दाखल झाले. पाकिस्ताननी जर अश्या सीमा उघडल्या तर त्यांचे East German लोकान्सारखे भारतात स्वागत होणार नाही. व  भारतात आलेले पाकिस्तानी East German लोकान्सारखे वागणार नाहीत. त्यांच्या मनात सूडाची तेवढी भावना असेल असे मला वाटते.
त्यानंतर एकत्रीकरणासाठी East व West Germany मधील लोकांनी एकसारखे प्रयत्न केले व शेवटी Germany चे एकत्रीकरण झाले. येथे दोन्ही कडच्या लोकांची एकत्र होण्याची भावना महत्वाची आहे. भारतात फार कमी लोकांची तशी इच्छा असावी असे मला वाटते. निदान माझी तरी तशी अजिबात इच्छा नाही.

East Germany च्या infra structure वर त्यानंतर West Germany ला आतोनात पैसा ओतावा लागला व त्याचा भार West German लोकांना उचलावा लागला. त्यातून बराच काळ East व West German नागरिकांमधे कुरबुरी निर्माण झाल्या. अशक्त East Germany तून असंख्य लोक West Germany मधे पैसा कामवायला आले. East Germany मधील उद्योगास त्यामुळे चांगलाच फटका बसला. पाकिस्तानाच्या एकत्रीकरणातुन भारताला रस्त्यावरच यायची वेळ येईल. बेकारी, अशिक्षितता व दहशतवाद यासाठी भारताकडे सध्या काहीही उत्तर नाही.
पुढची ५० वर्षे तरी भारत-पाकिस्तान एकत्रीकरण घडुन येण्याची शक्यता मला दिसत नाही.

No comments: