ये दौलतभी ले लो ये शोहरतभी ले लो

ये दौलतभी ले लो ये शोहरतभी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी. मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी....
आठवते का ही जगजीत सिहच्या आवाजातली गज़ल? ही गज़ल ऐकल्यावर मला माझे बालपण आठवतं आणि वाटतं खरच मिळेल का मला माझं बालपण परत जगायला? मिळेल का पुन्हा बाल्पणीचे खेळ खेळायला? भेटतील का माझे सवंगडी परत? पतंग, लंगडी, लगोरी आणि िकतीतरी खेळ...पावसात कागदाच्या होड्या सोडणं, त्याचा कंटाळा आला की नकळत कोणाची तरी चप्पल पाण्यात सोडणं,पाऊस पडल्यावर धावतपळत घरात जाणं आणि पाऊस झाल्यावर झाडावर बसुन झाडाखालुन येणार्या जाणार्याला भिजवत स्वतः ही भिजणं.ते अप्रतीम िदवस आजही मोत्याप्रमाणे जप्ले आहेतआजही त्या कळ्यांचा सुगन्ध तेवढाच सुखावणारा आहे.अजुनही आठवते ऊन्हात जाताना रागवणारी आई. अजुनही आठवतं ऊन उतरल्यचया आनंदात अनवाणी पायाने धावत जाणं, ऊन्हाळ्यातील संध्याकाळी रस्त्यावरील कोळसा चुकवत सायकल चालवणं,प्रत्येक संध्याकाळी फाटक्या टायरची रेस लावणं, कुणाला कुठे साप किंवा खेकडा दिसला की सगळ्या कंपुनी धावत जाणं आणि आपण किती आणि कुठे असे साप पाहिले याची गिनती करणं. बसची वाट पहात कंच्यांचे अनेक डाव रंगायचे, अनेकदा चिडायचे आणि पुन्हा पुन्हा खेळायचे.आजुनही तशीच कळ उठते काळजात जशी शहरात आल्यावर कंचे फेकताना उठली होती.घराच्या भोवती चारही दिशांना कंचे फेकले होते.अजुनही आठवतो शहरातील शाळेतला पहिला दिवस, वर्गात जागा नस्लयाने नवीन विद्यार्थ्यांना पाहुन उठ्लेल्या कपाळावरच्या आठ्या आणि जागा नसतानाही जवळ बसवणारी मैत्रिण (नंतर कळले की तिच्या ड्ोक्यात भरपुर पीक असल्याने कुणी तिच्य शेजारी बसाय्चे नाही.मी शिताफिने करुन घेतलेली स्वतःची सुटकाही आठवते.)नवीन शाळा, नवीन खोड्या, नवे अनुभव.आठवतं मला प्रत्येक शिक्शकानी घेत्लेले माझेे नाव, मला दिलेल्या ताकिदी आणि 'पुन्हा असे वागणार नाही' हे माझ्या कडुन घेतलेले वचन.वाटतं सगळं पुन्हा यावं. पण पुन्हा येणार कसं? पुन्हा ते खेळ येणार कसे जेव्हा vidoe games चा जमाना आहे, जेव्हा boy friend आणि Parties चे चलन आहे? कोण म्हणतं भारत मागासलेला आहे? इथेही dating आणि fashion ची प्रथा आहे. Parties मधे दारु अाम्हालाही नवीन नाही, दारु पिऊन भान हरपणे आम्हालाही गैर नाही.कर्जामुळे मरणारे शेतकरी, हुंड्यामुळे जळणार्या मुली...छे छे! ते अमचे बांधव नाही.केस रंगवणारे आणि आधुनिक पोषाख घातलेले Americanized Indians आज आमचे idols आहेत.

No comments: