East-West Germany आणि भारत - पाकिस्तान


बरेच दिवस मला वाटायच की East आणि West Germany च्या सारखेच भारत आणि पाकिस्तान चे एकत्रीकरण शक्य आहे. जास्ती खोलात गेल्यावर मात्र दोघांच्या विभाजनातले फरक लक्षात आले आणि माझी कल्पना मोडित निघाली.
दुसर्‍या महायुद्धानंतर मित्रपक्षांनी सम्पूर्ण Germany ला चार भागात विभागले. एक भाग अमेरिकीच्या खाली, दुसरा फ्रान्स च्याखाली, तिसरा ब्रिटन कडे तर चौथा रशिया कडे गेला. या विभाजनाच्या मागे नाझीवाद संपवणे, Germany मधील लष्कर हटवणे व तेथे लोकशाही आणणे असे हेतू होते. हे साध्य झाल्यावर विभाजीत भागांचे एकत्रीकरण करून नवीन राष्ट्र उभारण्याचा मित्रपक्षांचा उद्देश होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात कुठेही German  नागरिकांनी एकमेकांपासून वेगळ व्हायची इच्छा दर्शवली नव्हती. हे विभाजन त्यांच्यावर थोपवले गेले होते व विभाजनाचा अन्तिम उद्धेश एकत्रीकरण हा होता.
बर्लीन ही नझींची राजधानी असल्याने, हे शहर रशियाच्या विभागात असूनही चारही राष्ट्रांनी याचे विभाजन करून आपापले प्रशासन तेथे आणले.
१९४७ ते १९४९ च्या काळात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स प्रशासित भागांचे ठरल्याप्रमाणे एकत्रीकरण झाले व Federal Republic of Germany किंवा West Germany निर्माण झाले. परंतु Germany पूर्व भागावरचा ताबा सोडण्यास रशियाने नकार दिला व तेथे  German Democratic Republic (GDR) किंवा East Germany निर्मिती झाली. तसेच बर्लीनच्या तीन भागांचे एकत्रीकरण होऊन West Berlin व East Berlin निर्माण झाले. East Germany मधील communist  सरकार खालील लोकांना बाहेरच्या व खास करून West Germany च्या समृद्धीची कल्पना येऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रवासाची बंधने आणली व पाश्चिमात्य जगातील समृद्धीचे दर्शन घडवणारे TV shows निषिद्ध केले. पाश्चिमात्य जगातील Capitalistic society मधल्या भ्रष्टाचाराचे दर्शन घडावे म्हणून एक TV show तेवढा चालू ठेवला. तेवढ्या एका TV show  मधूनच East Germany लोकांना बाहेरच्या जगातील ऐशवर्याची कल्पना झाली.
पुढे मिखाईल गोर्बाचेव यांची रशिया मधे निवड झाली असता East Germany  मधील नागरिकांवर लादलेली अनेक बंधन शिथिल करण्यात आली. यातच प्रवासावर टाकलेली बंधने पण उठवल्या गेली. त्याच वेळी १९८९ साली East Germany  मधे नवीन सरकार सत्तेवर आले. East Germany च्या सीमेवरच्या रक्षकांना सीमा पार करणार्‍या नागरिकांना रोखण्याचे कुठलेही निर्देश ना दिल्याने त्यांनी सगळ्यान्ना West Germany मधे न रोकता जाऊ दिले. नवीन सरकार सत्तेवर आल्याच्या दुसर्‍याच आठवड्यात सुमारे ५० लाख East German West Germany त दाखल झाले. पाकिस्ताननी जर अश्या सीमा उघडल्या तर त्यांचे East German लोकान्सारखे भारतात स्वागत होणार नाही. व  भारतात आलेले पाकिस्तानी East German लोकान्सारखे वागणार नाहीत. त्यांच्या मनात सूडाची तेवढी भावना असेल असे मला वाटते.
त्यानंतर एकत्रीकरणासाठी East व West Germany मधील लोकांनी एकसारखे प्रयत्न केले व शेवटी Germany चे एकत्रीकरण झाले. येथे दोन्ही कडच्या लोकांची एकत्र होण्याची भावना महत्वाची आहे. भारतात फार कमी लोकांची तशी इच्छा असावी असे मला वाटते. निदान माझी तरी तशी अजिबात इच्छा नाही.

East Germany च्या infra structure वर त्यानंतर West Germany ला आतोनात पैसा ओतावा लागला व त्याचा भार West German लोकांना उचलावा लागला. त्यातून बराच काळ East व West German नागरिकांमधे कुरबुरी निर्माण झाल्या. अशक्त East Germany तून असंख्य लोक West Germany मधे पैसा कामवायला आले. East Germany मधील उद्योगास त्यामुळे चांगलाच फटका बसला. पाकिस्तानाच्या एकत्रीकरणातुन भारताला रस्त्यावरच यायची वेळ येईल. बेकारी, अशिक्षितता व दहशतवाद यासाठी भारताकडे सध्या काहीही उत्तर नाही.
पुढची ५० वर्षे तरी भारत-पाकिस्तान एकत्रीकरण घडुन येण्याची शक्यता मला दिसत नाही.

भारताचा वाली कोण?

गेल्या २ वर्षात भारतात विक्रमी संख्येनी घोटाळे उघडकीला आले. काही घोटाळे उघडकीला येण्यामागचे कारण म्हणजे विविध पक्षांमधील नेत्यांमधे चाललेली आपापसातली चाललेली लाथाळी तसेच दोन पक्षांमधे चालले राजकारण हे आहे.  तर उरलेल्या घोटाळे उघडकीस येण्याचे कारण त्या घोटाळ्यामधे न झाकता येणारा भ्रष्टाचार आहे. हे घोटाळे आधी होत नव्हते असे नाही पण आज एवढा वारेमाप पैसा या आधी भारतात नव्हता. पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आज इतके बातम्यांच्या चॅनल्सचे पीक आधी आलेले नव्हते. एखाद्या गायीला चार पायांऐवजी पाच पाय आहेत हे २४ तास चालणार्‍या बातम्यांच्या चॅनल्सवर दिवसातून कमीतकमी दोनदा दाखवले जात असेल तर घोटाळ्याबद्दल हे लोक दिवसातून कितीवेळेला दाखवत असतील याची कल्पनाच केलेली बरी! या सततच्या बातम्यांचे टोले हाणल्यावर शहाण्या माणसाच्या डोक्याला पोचे पडणारच. शिवाय आज नोकरी-कामा निमित्त परदेशात (पाश्चिमात्य देशात) जाणार्‍या लोकांची संख्या अगदी पाच ते दहा वर्षांच्यामानानी दुपटीनी वाढली आहे. नागपूर, कोल्हापूर, सातारा इत्यादी लहान शहरातल्या लोकांना सुद्धा भ्रष्टाचाराशिवाय आयुष्य किती सुकर होऊ शकते याची जाणीव झाली आहे. त्यांचे हक्क काय आहेत आणि ते राजकारण्यांनी आजवर कसे हीरावले याची कल्पना भारतात बहुतांश लोकांना झाली आहे. राजकारण्यांना सुद्धा याची जाणीव नक्कीच झालेली आहे. म्हणुनच एकमेकांच्या उरावर बसून दुसरा कसा आणि किती वाईट हे दाखवण्याचाच खटाटोप सतत होताना दिसतोय. घोटाळे उघडकीला येणे ही गोष्ट जरी चांगली असली तरी नेत्यांची एकमेकांच्या उरावर बसण्याची वृत्ती अत्यंत चिंताजनक आहे. सगळ्यांचा focus जर एकमेकांचे पितळ उघडे पाडणे एवढाच असला तर देशासाठी काम कोण करणार? आज माझ्या उरावर कोण बसणार हा विचार करण्यातच आपल्या नेत्यांनी वेळ घालवला तर महत्वाचे निर्णय सारासार विचार करून घेणार कोण? आज या पदावरून हा उडाला उद्या तो उडण्याचे चिन्ह आहेत असेच चित्र राहीले तर पुढे जाण्यासाठी हालचाल करण्याच्या ऐवजी जो तो पद आहे तोवर उपभोगायच्या मागे असणार. माझ्यानंतर आलेला घेत बसेल निर्णय मी जैसे थे चालू ठेवणार हीच वृत्ती सगळी कडे फोफावणार. सध्या काही वेगळे दिसते आहे अश्यातला भाग नाही. ऐन मंदीचे सावट डोक्यावर असताना आपले अर्थमंत्री आपल्या ग्रुहमंत्र्यांचे वाभाडे काढ्ण्यात मग्न आहेत. बर ते तरी छातीठोकपणे करावं ना. आता म्हणतात हे माझे विधान नाहीत.

ग्रुहमंत्र्यांनी सुद्धा यंत्रणेत बदल घडवून आणण्याचे निर्णय घेतलेले दिसत नाही. त्यांचे सारे लक्ष हातातुन निघुन गेलेल्या अर्थमंत्रालयाकडेच असल्याचे दिसून येते. या दोन मंत्र्यांची लाथाळी कमी की काय असे वाटून मधेच दिग्विजयसिंग यांचा धिंगाणा सुरू असतो. सध्या कुठलेही काम नसलेल्या, थोड्क्या आणि समर्पक शब्दात मांडायचे झाल्यास रिकामचोट असलेल्या, दिग्विजयसिंगांना लाळघोटुपणा करून पुढल्या सरकारात कुठले तरी मंत्रीपद मिळण्याची आस लागून आहे. काही वर्षांपूर्वी अजित जोगींचे असेच प्रयत्न फळास आले होते.
बर आत्ताचा गदारोळ कधीतरी आटोक्यात येऊन पुढच्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवण्याच्या आशेत बसलेल्या लोकांपुढे फारसे  options आहेत असे मूळीच नाही. आणि खरी चिंता तीच आहे.
कोंग्रेस ला पर्याय भाजपा एवढाच आहे. भाजपाची परिस्थिती कोंग्रेसपेक्षा दयनीय आहे. एवढ्या घोटाळ्यांमधेदेखील ती लोकांची सहानुभूती कमवण्यास असमर्थ ठरली असेच चित्र दिसते आहे. राजनाथ सिंग व नितीन गडकरी यांसारखे पक्षप्रमुख निवडुन तिला नेत्यांची किती भीक लागली आहे एवढेच दिसते. जिभेचा पट्टासोडुन बोलण्यात भाजपा मधील कोणीही मागे नसल तरी गडकरींचा हात धरणारा विरळाच! त्यांच्यात आणि लालू मधील शाब्दीक चकमाकीचे प्रसारण करण्यास एखाद्या वाहिनीला हक्क मिळाले तर त्या वाहिनीचे TRP एकारात्रीत दुपटीनी काय दसपटीनी वाढेल!
यशवंत सिन्हा व जसवंत सिंग यांचे उर्वरीत पक्ष नेत्यांशी वाकडे असल्याचे न ते लपवत न उर्वरीत पक्ष नेते लपवत. अडवाणींच्या कुरबुरी व पंतप्राधान बनायची महत्वाकांक्षा मधुन मधुन डोक काढतच असतात. काही वेळेस तर ते desparate झाल्याची लक्षणे त्यांच्या जिना विधाना वरुन, त्यांच्या इख्तार पार्टीला जाण्यावरुन व भ्रष्टाचार रथयात्रे वरून उघड होतात.
आजकाल नरेंद्र मोदी सुद्धा असेच दिशाहीन झाल्याचे दिसून येते. त्यांचा ३ दिवसांचा सद्भावना उपास त्यांना पंतप्राधानपदाची स्वप्ने पडायला लागण्याचे द्योतकच आहे!
एकंदर काय तर भाजपच्या कुठल्याही नेत्यासमोर भारताच्या भविष्याचे स्पष्ट चित्र असावे असा विश्वास ती लोकांमध्ये निर्माण करत नाही. शिवाय पंतप्रधान पदासाठी उमेदवार निवडण्यात पक्षामधेच एकजूट दिसत नाही. जोवर पक्ष एकजूट होत नाही तोवर कोंग्रेसी नेते कितीही चिखलात लोळले तरी त्याचा फायदा भाजपला होणे अशक्य आहे.
कोंग्रेसची अवस्था कोणापसुनच लपालेली नाही. त्यातल्या एकलाही देशाचे सोयर सुतक नाही. राहुल गांधीने पंतप्रधान बनणे ही कल्पनाच अंगावर शहारा आणते. दुःखात सुख एवढेच की सारेजण एकाच दिशेकडे पाहून बांग देतात.
अश्यावेळेस अंदाज येतो की १९व्या शतकात इंग्रजांना एवढ्या मोठया आणि दिगज्जांनी भरलेल्या भारतावर इतका सहज कब्जा कसा मिळवला!

असंच काहीतरी

काहीतरी लिहावं असं बरेच दिवसांचं वाटता आहे पण वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला तर डोक्याची पाटी कोरी सापडली. मनाच्या कप्प्यात जरा हात घालून पाहिला तर जड गोष्टी पहिले हाताला लागल्या. मनाची सार्या जगापेक्षा निराळीच रीत असते. जगात जड गोष्टी तळाशी जातात मात्र मनात जड गोष्टी वरच तरंगतात! पण आज हलक्या फुलक्या गोष्टी बोलूया. इतक्यात माझं मन हलकं करणारी एकाच गोष्ट आहे ती म्हणजे माझा पिल्लू! पिल्लू म्हणजे उत्साहाचा आणि प्रसन्नतेचा धबधबा आहे. झोपेतून उठून गळ्यात हात घालून गालावर गाल जेव्हा घासतो तेव्हा वाटता कोणी तोंडात साखरच घातली. डोळे मिटून अंग घासत मनी स्वतःचे लाड करून घेतो तेव्हा खरोखरची माऊ आठवते. 'खाली खाली', 'उतर', 'दुदू' , 'हवाय-हवाय' असं म्हणत पिल्लू ओढत खाली घेऊन जातो. दूध न पिता चूप चा झाकण चावत बसतो. स्वयंपाक घरातून ओढत पायरी जवळ नेऊन म्हणतो 'खुची - बशा बशा'. काम सोडून बसावसं वाटतं पण सकाळच्या धावपळीत बसणं होत नाही.
उठल्या पासून त्याची गाणी सुरु होतात. बरेचदा चालीवर भलतच काही तरी गातो पण चाल मात्र सोडत नाही. 'मैनेचा पिनना वन कानना' हे ऐकल्यावर पटकन उठून मुका घ्यावासा वाटतो. ९-१० महिन्याचा असताना मी त्याला जेव्हा गाणी ऐकवायचे तेव्हा याला काही कळत आहे का? असं वाटायचं. आता कळत आहे की त्याला सगळं कळायचं. मनूचा कौतुक करावं तेवढं थोडं. पठ्ठयाला लगेच गोष्टी पाठ होतात. एक दिवस शशूल-शशूलरे डुलक्या मारी म्हटलं तर दुसऱ्यादिवशी लगेच माझ्यासोबत गाऊ लागला. आजकाल त्याला माझ्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द त्याचं गाणं असावा असं वाटतं. मी दुसरं काही म्हटलं की म्हणतो 'नको'. कधी कधी वाटतं याला नाही म्हणावं मग वाटतं हे दिवस भराभर जातील आणि मला त्याच्या साठी गाणी गावीशी वाटतील तेव्हा त्याला मोठा झाला म्हणून लाज वाटेल. अश्या वेळेस वाटतं मुलगी हवी. मुलींचे लाड त्या कितीही मोठ्या झाल्या तरी करू शकतो. त्यांच्या केसातून त्या १२ वर्षाच्या झाल्यावरही हात फिरवला तरी त्यांना त्यात वावगं वाटणार नाही. मुलं मात्र लगेच नको म्हणतील. 
आमच्या सोनुला नाचायचाही नाद आहे. जरा ठेका ऐकला की स्वारी डोलायला लागते. लग्नात सोनू इतका नाचला की आता हा पाया दुखतो म्हणून झोपेत रडेल की काय अशी भीती मला वाटली. वरातीच्या band वरती band वाल्याच्या अगदी जवळ जाऊन नाचला. सगळे त्याच्याकडे कौतुकानी पहात होते. घरी मी कुटला गाणं  म्हणत डोलले की हा उठून नाचायला तयार असतो!
पिल्लू अगदी लाडोबा झाला आहे. त्याला वाटतं सगळी नावं त्याचीच आहेत. आई-बाबा फक्त त्याच्याच बद्दल बोलतात. त्याला म्हटलं 'कुंदा कोण?' तर स्वतःकडे बोट दाखवतो. बंडू, चंपा, सुगंध, छकुल या सगळ्या नावांना स्वतः कडे बोट दाखवतो. मग आम्ही आमची नावं घेतली तरी तो स्वतः कडेच बोट दाखवतो!
आमचा बाबी एक नंबर बडबड्या आहे. डोळ्यापुढे जे येईल ते बोललंच पाहिजे. कार मधून जाताना ट्रक किव्वा व्हान दिसली कि ओरडतो 'ती बग ट्रक'. सूर्य डोळ्यावर आला कि म्हणतो 'सन आली'. सूर्य झाडा मागे गेला कि म्हणतो 'सन लपली'. बऱ्याच गोष्टींना काहीच्या काही म्हणतो. चष्मा त्याच्या साठी 'चीमता' असतो आणि बाप्पा 'जीबाप्पा'. बऱ्याच गोष्टी काय बोलतो ते अजिबातच कळत नाही. काही गोष्टी शिकवताना पंचाईत होते. जसा काऊ म्हणजे कावळा आणि गाय. मग कावळा म्हणताना 'काव -काव काऊ' म्हणायचे. सिंह त्याच्यासाठी 'शिन्न' असतो पण आता हळू हळू त्याचा लायन होतो आहे. पुढे किती बदल होतील कोणास ठाऊक. बोलला नाही तरी मराठी कळावी असं वाटत रहात.
कधी वाटतं या सगळ्यातून आपल्याला वेळच मिळत नाही. मग वाटतं बघता बघता हा मोठा होईल आणि इतका वेळ मिळेल कि त्याचं काय करावं कळणार नाही.
छकुल असाच आनंदात राहावा. पहिल्या वर्षभरात त्याच्या तब्बेतीला झालेला त्रास पुन्हा आयुष्यात त्याला होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना!

लीप ईयर

 २०११ हे लीप ईयर नाही आणि २०१० पण लीप ईयर नव्हते. २००९, २०१० व २०११ मधे आलेल्या प्रत्येक २८ फेब्रवारी ला माला खुप खिन्न वाटले. वय तर वाढल पण वाढदिवसच आला नाही. मी वाढदिवस साजरा करण्या एवढी लहान नाही पण प्रत्येकाला आपल्या वाढदिवशी ख़ास वाटत असते. सकाली उठल्यावर आपल्याला फ़ोन येतील हे माहिती असते. लीप ईयर असला की कुणी २८ ला फ़ोन करत तर कुणी १ ला आणि दोन्ही दिवशी फ़ोन करणारे हटकून या दिवशी फ़ोन का केला याचे कारण सांगतात. तय भानगडीत आपण नकळत 'आज तुझा वाढदिवस नाही' याची समोरच्याला जाणीव करून देत आहोत हे त्यांच्या ध्यानी-मनीही नसते. त्यावर बलेच हसण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि पुढच्या दिवसाला जड मनानी आणि जड पावलानी सुरुवात होते. त्यात जर २८ तारीख  सुट्टीच्या दिवशी आली तर तो दिवस अतिशय कन्तालावाना आणि लांब वाटतो. त्या दिवशी एक ठिकाणी बसणे अवघड होते व असतील नसतील तेवढी काम काढून कामामूले दिवस अंगावर येणार नाही याची कालजी घेतल्या जाते. तरीही तो दिवस अंगावर आल्या शिवाय राहात नाही. मग विचार येतो मीच का? काही लोक म्हणतात किती चांगल आहे, तुझा वाढदिवस सगल्यान्ना लक्षात राहतो पण विसरानारे त्यातुनही विसरतात आणि लक्षात ठेवणारे काही तरी विनोदी वाक्य टाकुन २९ तारीख या वर्षीच्या फेब्रुवारी मधे नाही याची आठवन करून देतात. 'तू आता किती वर्षाची झाली?' हे त्यातले एक विनोंदी वाक्य. नेहमीच वाटत 'मरो मेला unique वाढदिवस, साधा सरळ दर वर्षी येणारा वाढदिवस त्यापेक्षा चालला असता.' आलिया भोगासी म्हणत २०१२ ची वाट पाहण्याशिवाय काय उपाय?