२०११ हे लीप ईयर नाही आणि २०१० पण लीप ईयर नव्हते. २००९, २०१० व २०११ मधे आलेल्या प्रत्येक २८ फेब्रवारी ला माला खुप खिन्न वाटले. वय तर वाढल पण वाढदिवसच आला नाही. मी वाढदिवस साजरा करण्या एवढी लहान नाही पण प्रत्येकाला आपल्या वाढदिवशी ख़ास वाटत असते. सकाली उठल्यावर आपल्याला फ़ोन येतील हे माहिती असते. लीप ईयर असला की कुणी २८ ला फ़ोन करत तर कुणी १ ला आणि दोन्ही दिवशी फ़ोन करणारे हटकून या दिवशी फ़ोन का केला याचे कारण सांगतात. तय भानगडीत आपण नकळत 'आज तुझा वाढदिवस नाही' याची समोरच्याला जाणीव करून देत आहोत हे त्यांच्या ध्यानी-मनीही नसते. त्यावर बलेच हसण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि पुढच्या दिवसाला जड मनानी आणि जड पावलानी सुरुवात होते. त्यात जर २८ तारीख सुट्टीच्या दिवशी आली तर तो दिवस अतिशय कन्तालावाना आणि लांब वाटतो. त्या दिवशी एक ठिकाणी बसणे अवघड होते व असतील नसतील तेवढी काम काढून कामामूले दिवस अंगावर येणार नाही याची कालजी घेतल्या जाते. तरीही तो दिवस अंगावर आल्या शिवाय राहात नाही. मग विचार येतो मीच का? काही लोक म्हणतात किती चांगल आहे, तुझा वाढदिवस सगल्यान्ना लक्षात राहतो पण विसरानारे त्यातुनही विसरतात आणि लक्षात ठेवणारे काही तरी विनोदी वाक्य टाकुन २९ तारीख या वर्षीच्या फेब्रुवारी मधे नाही याची आठवन करून देतात. 'तू आता किती वर्षाची झाली?' हे त्यातले एक विनोंदी वाक्य. नेहमीच वाटत 'मरो मेला unique वाढदिवस, साधा सरळ दर वर्षी येणारा वाढदिवस त्यापेक्षा चालला असता.' आलिया भोगासी म्हणत २०१२ ची वाट पाहण्याशिवाय काय उपाय?
2 comments:
वाढलेले वय म्हणजे पंखात जोडली जाणारी अनुभवाची पिसे. ती वर्षांच्या हिशेबाने मोजण्याची पद्धत बरोबर आहे असे मला वाटत नाही.
Tumacha blog awadala. Abhinandan. Sata lihit rahave
==
Mahesh.
Post a Comment